Posts

गढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र

Image
गढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र By   अरुण मळेकर साम्राज्यांची, राजसत्तांची संस्कृती आणि त्यांचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ज्या अनेक प्रकारच्या वास्तू इतिहासक्रमात निर्माण झाल्या, त्यांत विविधतेबरोबर कलात्मकताही आहे. त्यात अभेद्य  तटबंदीच्या  गडकोटांचा हिस्सा फार मोठा आहे व त्यांचा उल्लेख वारंवार होत असतो. ते गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणाच आहे. पण ‘ गढी ’ हा वास्तुप्रकार अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झाला. ‘गढी’ वास्तू म्हणजे सपाट भूमी आणि पहाडावरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ती प्राथमिक अवस्था होय. गढ्या त्यांचे अस्तित्व  मराठवाडा , खानदेश या प्रदेशांत टिकवून आहेत. गढ्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ या भागांत तर जास्त आढळतात. ‘मिर्च मसाला’ या चित्रपटात गढी वास्तूमधील समाजजीवनाचे चित्रण होते. स्थानिक अखत्यारीतील परिक्षेत्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली, गडकोटाचे प्रतीक असलेली वास्तू म्हणजे गढी. मर्यादित प्...

दौला-वडगावची निजामशाही गढी

Image
दौला-वडगावची निजामशाही गढी By   सदाशिव शिवदे दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे नाव का पडले याचे कारण कदाचित त्या विभागाच्या निजामशाहीतील सरदाराचे नाव दौलाखान किंवा दौलतखान असावे. गढी गावाच्या उत्तरेस आहे. तिचे चाळीस फूट उंचीचे महाकाय बुरूज व तटबंदी भक्कम आहेत. बुरूजांचे खालचे बांधकाम दगडी असून वरील बांधकाम विटांचे आहे. त्यामुळे ते अतिशय सुबक, रेखीव आणि देखणे दिसते. भव्य दरवाजा, सुबक कमान, घडीव दगडांच्या बाजू आणि वर विटांच्या बांधकामातील कमानीने सजलेला सज्जा हे सारे उत्तम स्थितीत टिकून आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूच्या तटबंदीच्या भिंतीतून सज्जावर चढण्यासाठी दगडी पाय-यांचा जिना आहे. त्यावरून सहजपणे सज्जात जाता येते. आतील बाजूस इमारतींच्या कमानी व काही दालनांचा भाग चांगल्या स्थितीत आढळतो. एक मुस्लिम कुटुंब सध्या तेथे वास्तव्य करत आहे. एका बाजूस दिवाणखान्याचे अवशेष स्पष्टपणे दिसतात. साडेचार फूट रुंदीच्या पल्लेदार भिंती, भक्कम जोती, प्रत...

कोपरगाव येथील पेशवेकालीन वाडे

Image
कोपरगाव येथील पेशवेकालीन वाडे रघुनाथरावांना (राघोबादादा) पेशवाईची वस्त्रे नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर 10 ऑक्टोबर 1773 रोजी मिळाली. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सखारामबापू, त्रिंबकराव मामा, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे आदी प्रमुख बारा मंडळींनी एकत्र येऊन बारभाई मंडळ स्थापन केले आणि त्यांनी राघोबादादांना पदच्युत करून कारभार स्वतःच्या हाती घेतला. राघोबादादांनी पेशवाई परत मिळवण्यासाठी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले. राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास 23 फेब्रुवारी 1775 रोजी आले. दादा इंग्रजांबरोबर सतत सात – आठ वर्षें राहिले. इंग्रज व मराठे यांच्यात तह महादजी शिंदे यांच्यामार्फत ग्वाल्हेरपासून वीस मैलांवर सालबाई येथे 17 मे 1782 रोजी झाला. तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास पेशव्यांच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी महादजी शिंदे यांच्या सल्ल्यावरून कोपरगावला कायम वास्तव्य करण्याचे ऑगस्ट 1783 मध्ये ठरवले. ते कोपरगावला आले. नाना फडणवीसांनी राघोबादादांना दरमहा पंचवीस हजार रुपयांचे पेन्शन मंजूर केले. पेशव्यांचे दोन भव्य वाडे कोपरगाव येथे होते. एक वाडा खुद्द कोपरगाव येथे बघण्...

नाईक निंबाळकर वाडा , वाठार निंबाळकर..

Image
मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास   Home   ▼ WEDNESDAY, 4 AUGUST 2021 नाईक निंबाळकर वाडा , वाठार निंबाळकर..   नाईक निंबाळकर वाडा , वाठार निंबाळकर.. फलटणचा इतिहास व ऐतिहासिक वास्तु म्हणजे निंबाळकर याचा प्रत्यय आपल्याला फलटण फिरताना जागोजाग दिसुन येतो. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात वाठार निंबाळकर येथील राजे नाईक निंबाळकर यांची किल्लेवजा गढी महाराष्ट्रात असलेल्या इतर सर्व गढीपेक्षा खूपच वेगळी आहे. येथे केवळ एक स्वतंत्र गढी नसुन तटाबुरुजांनी सजलेल्या सहा स्वतंत्र गढ्या व दोन मंदिरे असुन हि सर्व ठिकाणे एका मुख्य तटबंदीच्या आत सामावली आहेत. बांधकाम सौंदर्याने सजलेल्या या वास्तु आज दुर्दशेच्या फेऱ्यात सापडुन नष्ट होत आहे. यात केवळ एक गढी याला अपवाद आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स...
Image
निमगावची ऐतिहासिक गढी भिमानदीच्या निळ्याभोर पाण्याच्या प्रवाहाला खेटूनच ही निमगावची ऐतिहासिक गढी आहे.        कोरोना संसर्ग प्रमाण कमी झाल्याने व नुकतीच या आजारावर लस आल्याच्या वृत्ताने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दि.१६ जानेवारी २०२१ ला सकाळी ८ वाजता मी पुण्याहून (कात्रज) येथून चाकणला निवासी असणारे आमचे लेखक मित्र श्री.मनोहर मोहरे यांच्याकडे निघालो. भेटीचे नियोजन व इतर चर्चा अगोदरच झाली होती. कात्रज मधेच एका दिवसाचा ७० रुपयेचा बसचा पास घेतला. सकाळी ९ वा.भोसरी येथे पोहोचलो तर राजगुरुनगरला जाणारी बस त्वरित मिळाली. आंबेठाण चौकात ९:४५ ला पोहोचलो. मग मोहरे सरांना मी तेथे उतरल्याचे चलभाषवरून कळविले व ते लगेचच दुचाकी घेऊन आले. मग आमचा दुचाकीचा प्रवास सुरू झाला. भिमानदी पार करून निमगाव येथे पोहोचलो. राजगुरुनगर पासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावाचे प्रवेशद्वारासमोर असलेल्या उपहारगृहात गरमा गरम चहा घेतला व प्रवासाचा काहीसा आलेला थकवा घालविला. मग गावातील ऐतिहासिक गढी/ वाडा पाहण्यास निघालो. पूर्वीच्याकाळी संपूर्ण गावाला तटबंदी असावी हे पुरातन गाव प...
Image
मा. विलासराव देशमुखांच्या मामांची गढी… मौजे भाळवणी ता. आष्टी जि.बीड येथे साहेबांचे आजोबा भाऊसाहेब आणि आजी गुणाबाई यांना नानासाहेब, साहेबराव आणि भैय्यासाहेब ही तीन मुले आणि गजराबाई (आण्णासाहेब देशमुख जहागीरदार निलंगा ) कलावतीबाई ( हणमंतराव माने देशमुख अकलूज)व सोजरबाई उर्फ सुशीलाबाई या तीन मुली झाल्या..पैकी सुशीलाबाईंचा विवाह मौजे बाभळगाव ता.जि. लातूर येथील मा. दगडोजीराव देशमुखांशी झाला. त्यांच्याच पोटी मा. विलासराव व मा. दिलीपराव ही दोन मुले झाली. आई सुशीलाबाई सोबत विलासराव लहानपणी भाळवणीला नेहमी यायचे. मामा नानासाहेबासोबत त्यांचे पोहणे फिरणे घोड्यावर दौड मारणे व्हायचे. पुढील पिढीत व्याप आणि गॕप वाढला. तरी साहेब नाते जपणारे असल्याने मुख्यमंञी झाल्यानंतर आवर्जून मामाच्या गावाला लाल दिवा घेऊन आले..तेव्हा पहिला रोड तयार झाला.. खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर भाळवणीची जहागीरी आप्पासाहेब निंबाळकरांना मिळाली. तीन एकरावरील किल्लेवजा भव्य गढी त्याला पाच बुरुज, पुढील बाजूस कचेरी आणि बाहेर तबेला तसेच पाण्यासाठी बारव आहे…गढीत जाण्यासाठी देवगिरी किल्ल्याप्रमाणे एकामागून एक तीन दर...
Image
सरदार वाबळे गढी, म्हातार पिंपरी – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी ह्या गावात सरदार जानराव वाबळे यांची सरदार वाबळे गढी म्हणजे तीन वाडे आहेत. हे गाव नगर – दौंड रस्त्यावर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील पाटसवरून ३५ कि.मी अंतरावर आहे. या तीनपैकी एका वाड्यात काही वाबळे कुटुंबीय राहतात. दोन वाडे अखेरची घटका मोजत आहेत. संपूर्ण गावाभोवती तटबंदी होती. गावाबाहेर एक वेस असून ती उत्तम स्थितीत आहे. तिला चिकटूनच बावळ्यांचे हैबत भैरवनाथ याचे अतिशय मजबूत आणि देखणे असे मंदिर आहे. या मंदिरात एक शिलालेख आहे. त्याच्या मजकुरावरून हे मंदिर शके १६६४ म्हणजे सन १७४२ मध्ये बांधले आहे, हे लक्षात येते. शिलालेखाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे: ‘श्री म्हातार भैरवनाथ प्रसन्न । तयाचे चरणी दृढ भाव यमाजी वलद यशवंतराव पाटील बावळे मोकादम यांचे पुत्र संताजी व राणोजी व चापोजी व जानोजी यशवंतराव पाटील बावळे मीजे म्हातार पिंप्री सके काल १जु. सुभा सन ११४१ स. १६६४ दुंदुभी नाम संवत्सरे मार्ग शु।। त्रयोदशी देवालय बांधले असे. सामाजी गोधाजी बलद बाबाजी नजीक न.म. श्री. कुलकर्णी मौजे मदजे।।’   यातील ...